फाळणी ही भारतीय जनजीवनातील एक अत्यंत दु:खदायक, तशीच परम दुर्दैवी घटना. तिचे दु:खद वर्णन करताना शब्द लुळे-दुबळे होतात...
सत्तांतर होत असताना भारतीय नेत्यांना फाळणी नाइलाजाने पत्करावी लागली. परमपवित्र मायभूमीची चिरफाड पत्करण्याखेरीज अन्य इलाज उरला नव्हता, तरी भारतदेश कायम विस्कळीत व त्यामुळे दुबळा राहावा, या दुष्ट हेतूने सत्तांतराच्या वाटाघाटींच्या वेळी भारतातील संस्थानांचे अस्तित्व टिकवण्याचा जो कुटील डावपेच इंग्रजांतर्फे टाकण्यात आला, तो मात्र पं. नेहरू, सरदार पटेल आदी नेत्यांनी समर्थपणे उधळून लावला.......